मंदिर इनाम जमीन हक्क निर्मूलन कायद्याविरोधात नाशिकमध्ये मंदिर विश्वस्तांची बैठक
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक, 01 जून (हिं.स.)। :प्रस्तावित ''मंदिर इनाम जमीन हक्क निर्मूलन कायदा'' हा हिंदू देवस्थानांप्रती भेदभाव करणारा आणि मंदिरांवर अन्याय व आघात करणारा आहे, असा आरोप करत या कायद्याला पूर्णपणे विरोध करण्यास
मंदिर इनाम जमीन हक्क निर्मूलन कायद्याविरोधात नाशिकमध्ये मंदिर विश्वस्तांची बैठक


मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

नाशिक, 01 जून (हिं.स.)।

:प्रस्तावित 'मंदिर इनाम जमीन हक्क निर्मूलन कायदा' हा हिंदू देवस्थानांप्रती भेदभाव करणारा आणि मंदिरांवर अन्याय व आघात करणारा आहे, असा आरोप करत या कायद्याला पूर्णपणे विरोध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, मंदिर, अर्चक एवं पुरोहित संपर्क आयाम यांच्या वतीने एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही महत्त्वाची बैठक बुधवार दिनांक ३ जून रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत दादा जेठानंद पागरानी ट्रस्ट हॉल इंद्रकुंड मागे पंचवटी, नाशिक येथे पार पडणार आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे की, हा प्रस्तावित कायदा मंदिरांची मालमत्ता, त्यांची परंपरा आणि धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे. इनाम जमिनींमधून मिळणारे उत्पन्न हे मंदिरांच्या देखभाल, सेवा, उत्सव आणि धार्मिक कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, परंतु या कायद्यामुळे मंदिरांच्या आर्थिक स्रोतांवर गदा येईल आणि धार्मिक परंपरा व सेवा धोक्यात येतील. त्यामुळे हा कायदा धार्मिक स्थळांच्या हिताला घातक असून तो संपूर्णतः रद्द करण्यात यावा, नवीन तज्ञ समिती नियुक्त करून याचा सखोल अभ्यास करावा, मंदिरांच्या हक्कांचे संरक्षण करणारे नवीन प्रारूप तयार करावे आणि मंदिरांची मालमत्ता अबाधित ठेवावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मंदिरांचे अस्तित्व, संस्कृती आणि धार्मिक परंपरा वाचवण्यासाठी सर्व मंदिरांनी सरकारकडे आपले सर्व आक्षेप जास्तीत जास्त संख्येने नोंदवणे आवश्यक आहे. मंदिर वाचवा! सनातन वाचवा! या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला नाशिक जिल्ह्यातील सर्व मंदिर विश्वस्त, पुजारी, अर्चक, पुरोहित आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद, नाशिक तर्फे करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ९८९०९०५४२० ८८८८७९८२३२८०८७४७२२७८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande