
लातूर, 01 जून (हिं.स.)।
देवणी तालुक्यातील वलांडी येथील शेत जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात वलांडी येथील माजी सरपंचासह चार जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुशिलाबाई प्रल्हाद पांचाळ (वय ७१, रा. वलांडी, ता. देवणी, सध्या रा. कातपूर रोड, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राम किशनराव भंडारे, अयुबमिया पाशमिया खुरेशी, खलील यासीनसाब मुंजेवार आणि राजू गंगापुरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत देवणी तालुक्यातील वलांडी शिवार परिसरात आरोपींनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी
फिर्यादी यांची दिशाभूल केली. शेती खरेदी व्यवहारात बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लामतूरे हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis