पुण्यात शरद पवार गटाकडून माजी नगरसेवक श्रीकांत पाटलांना उमेदवारी
पुणे, 01 जून (हिं.स.) - पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने उमेदवार मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनंतर पक्षाने नि
Pawar Sahrad


पुणे, 01 जून (हिं.स.) - पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने उमेदवार मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनंतर पक्षाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे महायुतीसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने पुणे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीतील उमेदवारीवरून निर्माण होणाऱ्या संभाव्य नाराजीचा राजकीय लाभ घेण्याची रणनीती पक्षाने आखल्याचे मानले जात आहे.हा मतदारसंघ महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वाट्याचा असला तरी पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद लक्षणीय वाढली आहे. राष्ट्रवादीनंतर भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा प्रभावी पक्ष असल्याने महायुतीमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande