
रत्नागिरी, 10 जून (हिं.स.) : खेड तालुक्यातील जगबुडी नदीमध्ये तिघा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, हे तिघेही तरुण स्थानिक असण्याची शक्यता आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहीम राबवून तिघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांची नेमकी ओळख अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच ते नदीकाठी कोणत्या कारणासाठी गेले होते, याबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या खोल पाण्यात किंवा धोकादायक ठिकाणी जाण्याबाबत नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी