अकोला जिल्ह्यात 114 ठिकाणी महाआरती व विशेष पूजा
अकोला, 10 जून (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची 4,399 दिवसांची यशस्वी कारकीर्द पूर्ण करून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढला आहे. या ऐतिहासिक कामगिरीनिमित्त तसेच पंतप्रधान मोदींना दीर्घायुष्य लाभावे, त्यांच्या नेतृत
Photo


अकोला, 10 जून (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची 4,399 दिवसांची यशस्वी कारकीर्द पूर्ण करून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढला आहे. या ऐतिहासिक कामगिरीनिमित्त तसेच पंतप्रधान मोदींना दीर्घायुष्य लाभावे, त्यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर जावा आणि भारतीय जनता पक्षाने अभिप्रेत असलेली सर्व कार्ये त्यांच्या हातून घडावीत, या सदिच्छेने अकोला जिल्ह्यात 114 ठिकाणी महाआरती व विशेष पूजा अर्चना करण्यात आली.

खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री ॲड. आकाश कुंडकर, आमदार प्रकाश भारसाकडे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.

'सर्वसामान्यांच्या संवेदना जाणणारा नेता'

ओबीसी समाजातून पुढे येऊन देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी 'सबका साथ, सबका विकास' या मंत्राने देशाला नवी दिशा दिली. जगातील सर्वाधिक विदेशी राष्ट्रांनी त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

या महाआरती व पूजा कार्यक्रमाला संतोष शिवरकर, किशोर पाटील, तेजराव थोरात, महापौर शारदा खेडकर, विजय अग्रवाल, जयंत मसने, वैशाली पालीवाल, शेंडे, हर्षद साबळे, सुलभाताई दुतोंडे, मायाताई घुले, मनीष गावंडे, योगेश गोतमारे, कृष्णा चव्हाण, चंद्रकांत अंधारे, माधव मानकर, अंबादास उमाळे, ॲड. रूपाली काकडे, ॲड. देवाशिष काकडे, संजय गोटफोडे, आम्रपाली उपरवट, जयश्री फुंडकर, वैशाली शेळके, वैशाली निकम, सुलभाताई सोळंके, उमेश पवार यांच्यासह मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शंखनाद, घंटानाद व 'भारत माता की जय'च्या गजरात संपूर्ण जिल्हा भक्तिमय झाला होता. पंतप्रधान मोदींच्या उत्तम आरोग्यासाठी व 'विकसित भारत 2047'च्या संकल्पपूर्तीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande