बीड : दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरवाढीचा निर्णय
बीड, 10 जून (हिं.स.) : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, तालुका दूध डेअरी असोसिएशनच्या वतीने नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यात दुधाच्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या भावात दरवाढ करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल
बीड : दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरवाढीचा निर्णय


बीड, 10 जून (हिं.स.) : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, तालुका दूध डेअरी असोसिएशनच्या वतीने नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यात दुधाच्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या भावात दरवाढ करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग लांडे, उपाध्यक्ष पांडुरंग कुलथे आणि सचिव रवी शेजुळ यांनी अधिकृतपणे दिली आहे.

दर निर्णयानुसार सुधारित प्रतिकिलो आणि प्रतिलिटर रुपयांत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये म्हशीचे दूध ८० रुपये, गाईचे दूध ७० रुपये आणि दही ८० रुपये प्रतिलिटर/किलो करण्यात आले आहे. तसेच पनीर ४०० रुपये किलो, गावरान तूप १००० रुपये किलो आणि गाईचे तूप १२ शे म्हणजेच १२०० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री करण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला.बैठकीस अनस शेख, गणेश यादव, माउली नायबळ, डिगांबर गिरी, रमेश राठोड, अजय शेंडगे, पांडुरंग लांडे, विवेक आबुज, सुखदेव मुळे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande