
लातूर, 10 जून (हिं.स.)। लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
बैठकीत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तीनही जिल्ह्यांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. आगामी मतदान प्रक्रियेत प्रभावी नियोजन करून मतदान केंद्रांवर अधिकाधिक मतदान यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. निवडणूक निरीक्षक सुनील राणे, आमदार रमेशप्पा कराड, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, लातूर जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील तळेगावकर, शिरूर कासार नगरपरिषद अध्यक्षा प्रतिभा गाडेकर, धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह तीनही जिल्ह्यांतील भाजपचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis