अकोल्यात आ. सावरकरांच्या पुढाकाराने   बियाणे महोत्सव
अकोला, 10 जून (हिं.स.)। विधिमंडळाचे मुख्य प्रतोद तथा आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ''शेतकऱ्यांचे बियाणे शेतकऱ्यांसाठी'' या संकल्पनेवर आधारित भव्य बियाणे महोत्सव 2026 उत्साहात संपन्न झाला. तालुका कृषी
Photo


अकोला, 10 जून (हिं.स.)। विधिमंडळाचे मुख्य प्रतोद तथा आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 'शेतकऱ्यांचे बियाणे शेतकऱ्यांसाठी' या संकल्पनेवर आधारित भव्य बियाणे महोत्सव 2026 उत्साहात संपन्न झाला. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अकोला यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार रणधीर सावरकर म्हणाले, बियाणे हा शेतीचा आत्मा आहे. शेतकऱ्यांना योग्य दरात, योग्य वेळी गुणवत्तापूर्ण बियाणे मिळाले तरच उत्पादन वाढेल आणि शेतकरी समृद्ध होईल. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी असा महोत्सव गरजेचा आहे. शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

शेतकऱ्यांना थेट फायदा :

1. प्रमाणित बियाणे एकाच छताखाली* : सोयाबीन, कापूस, तूर, मूग, ज्वारी यांसह विविध पिकांची नवीन व सुधारित वाणांची बियाणे उपलब्ध.

2. तज्ज्ञांचे मार्गदर्शन :- कोणत्या जमिनीसाठी कोणते वाण योग्य, पेरणीची पद्धत, खत व्यवस्थापन याबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून मोफत मार्गदर्शन.

3. फसवणुकीला आळा :- शासकीय यंत्रणेमार्फत तपासलेले, प्रमाणित बियाणे मिळाल्याने बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांची सुटका.

4. सबसिडीची माहिती :- विविध योजनांतर्गत बियाण्यांवरील अनुदानाची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत.

या महोत्सवाला तालुका कृषी अधिकारी भोर साहेब, उपसभापती ज्ञानेश्वर महल्ले, संचालक राजेश बेले, अभिमन्यु वक्टे, वैभव माहोरे, भरत काळमेघ, दिनकर वाघ, अंबादास उमाळे, निळकंठ खेळकर, दिगंबर गावंडे, देवेंद्र देवर, दिवाकर चांदुरकर, विठ्ठल चतरकर उपस्थित होते.

शेतकऱ्यांची प्रतिक्रिया :

आमदार साहेबांमुळे आम्हाला एकाच ठिकाणी चांगल्या कंपनीचे बियाणे मिळाले. दरही बाजारापेक्षा कमी आणि विश्वासार्ह, अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. खरीप हंगामाच्या तोंडावर आमदार रणधीर सावरकर यांच्या पुढाकाराने झालेला हा बियाणे महोत्सव अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande