
छत्रपती संभाजीनगर, 10 जून (हिं.स.)।
एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ जाहीर झालेले आहे. त्यानुसार राज्यातील हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाह २०० युनिट पर्यंत मोफत वीज सवलत देण्याची व गणेश चतुर्थी निमित्त पाच पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमाणित व नोंदणीकृत विणकरांना गणेश उत्सव भत्ता योजना सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेचा लाभ घेणेकरीता नोंदणीकृत विणकरांकडून अर्ज मागविले आहेत.सदर अर्ज प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, बाळासाहेब पवार सहकार भवन, तिसरा मजला, जाफर गेट, छत्रपती संभाजीनगर यांचे मार्फत विहित नमुन्यातील अर्ज दिनांक २५ जून.२०२६ पर्यंत मागविण्यात येत आहेत.
नोंदणीकृत विणकरांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दिनांक २५ जूनपर्यंत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग संभाजीनगर कार्यालयाकडे कागदपत्रासह सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात उपलब्ध आहे, असे उपआयुक्त, वस्त्रोद्योग, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis