
छत्रपती संभाजीनगर, 10 जून (हिं.स.)। बदनापूर शहरातील भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते महेश लड्डा यांच्या दुकानाला अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळताच आमदार नारायण कुचे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेत संबंधितांशी चर्चा केली तसेच महेश लड्डा यांना धीर देत या कठीण प्रसंगातून लवकर सावरण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. संबंधित प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून आवश्यक ती मदत व सहकार्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis