बीड विधानसभा मतदारसंघातील विविध कामासंदर्भात भेट
बीड, 10 जून (हिं.स.) उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड विधानसभा मतदारसंघातील विविध कामासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भेट घेतली. यामध्ये प्रामुख्याने मागील काही काळात बीड शहरात मो
अ


बीड, 10 जून (हिं.स.) उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड विधानसभा मतदारसंघातील विविध कामासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भेट घेतली. यामध्ये प्रामुख्याने मागील काही काळात बीड शहरात मोठ्या प्रमाणात आगीच्या दुर्घटना घडलेल्या असून यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे,पालिकेचे अग्निशामक दल हे वाहन तसेच आदी यंत्रेणेबाबतित कमी पडत असुन यासाठी जिल्हा वार्षिक योजना व आदी माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली,त्यावर त्यांनी तत्काळ यंत्रणेला कॉलवर बोलुन एक सुसज्ज वाहन जिल्हा वार्षिक योजनेतुन मंजुर करण्याचे सांगितले आणि अजुन एक वाहन हे शासनाच्या योजनेतून मंजुर असून त्याचे वितरण मात्र झाले नाही तर,ते देखील लवकर देण्यासाठी संबंधित विभागाशी त्यांनी बोलणे केले.असे मिळुन 2 वाहन हे लवकरच अग्निशामक दलाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

बीड शहरात सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून विविध कामे चालू असून ही कामे संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे यामध्ये जीवतहाणी देखील होत आहेत.यासाठी यंत्रेनेला आदेशीत करून कामे लवकर पूर्ण करण्याचे सूचित करावे. मतदारसंघातील ग्रामीण भागात विविध ठिकाणची कामे ही प्रलंबित आहेत त्यासाठी शासन स्तरावरून कामांना निधी उपलब्ध व्हावा. बीड शहरातील रस्ते व आदी.कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून भरघोस निधीची तरतूद करण्यात यावी. मतदार संघातील शेतकऱ्यांची विविध कामे जिल्हा बँक,खाजगी बँका,कृषी विभाग,महावितरण यांच्याकडे प्रलंबित आहेत याबाबतीत आपल्या स्तरावरून संबंधित यंत्रणेला आदेशित करावे. यासह अन्य महत्वाच्या बाबींवर चर्चा झाली यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande