
बीड, 10 जून (हिं.स.)राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची बीड शहर व ग्रामीण भागातील विविध कामांच्या बाबतीत भेट भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भेट घेतली. यामध्ये बीड शहरातून जाणारा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग हा जालना रोड व बार्शी रोड असा बीड बाहेर जातो,याठिकाणी वाढत्या शहरीकरणामुळे सातत्याने ट्रॅफिक जाम होणे व आदी समस्येला बीडकरांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण (मोठ्या नाल्यासहित) करण्यासाठी निधी मंजुर करावा.अशी मागणी केली. तसेच बीड शहरातील व बीड ग्रामीण भागातील विविध विकास कामांच्या बाबतीत पत्र दिली.बीड शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या विविध रखडलेल्या कामांच्या बाबतीत चर्चा केली.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis