परभणी - कापूस उत्पादकता अभियानातंर्गत पीक प्रात्यक्षिकांसाठी लाभार्थी निवड प्रक्रियेबाबत आवाहन
परभणी, 10 जून (हिं.स.) भारत सरकारने सन २०२६-२७ अंतर्गत कापूस उत्पादकता अभियान (कपास कांती) एमसीपी या नव्या अभियानाला मान्यता दिली असून, हे अभियान सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत सघन कापूस लाग
परभणी - कापूस उत्पादकता अभियानातंर्गत पीक प्रात्यक्षिकांसाठी लाभार्थी निवड प्रक्रियेबाबत आवाहन


परभणी, 10 जून (हिं.स.) भारत सरकारने सन २०२६-२७ अंतर्गत कापूस उत्पादकता अभियान (कपास कांती) एमसीपी या नव्या अभियानाला मान्यता दिली असून, हे अभियान सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत सघन कापूस लागवड प्रात्यक्षिके (एचडीपीएस) (९० x १५ सें.मी. अंतरावर), क्लोजर लागवड (९० x ३० सें.मी. अंतरावर) पद्धती व एकात्मिक पीक व्यवस्थापन (९० x ६० सें.मी. अंतरावर) या बाबींसाठी लाभार्थी निवड महाडीबीटी पोर्टलवर करण्यात येणार आहे.पीक प्रात्यक्षिके शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांमार्फत राबविण्यात येतील. शेतकरी गट हा ३१ मार्च २०२६ पूर्वी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. गटाची निवड महाडीबीटी पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएस) तत्वावर करण्यात येईल. प्रति गट कमाल २५ शेतकरी तसेच प्रति गाव प्रति पीक जास्तीत जास्त दोन गटांची निवड केली जाणार आहे.लाभ मिळणाऱ्या शेतकरी सभासदांचा अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे बंधनकारक राहील. तसेच शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी प्रपत्र ‘अ’ प्रमाणे नमूद हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे.उपरोक्त निकष पूर्ण करणाऱ्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी आपले अर्ज महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande