महाडीबीटी पोर्टलवर तूर बियाण्यासाठी अर्ज सुरू
50 टक्के व 100 टक्के अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर, 10 जून (हिं.स.) : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या विभागांतर्गत बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा आण
महाडीबीटी पोर्टलवर तूर बियाण्यासाठी अर्ज सुरू


50 टक्के व 100 टक्के अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, 10 जून (हिं.स.) : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या विभागांतर्गत बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान 2026-27 अंतर्गत तूर बियाण्यांवर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

योजनेअंतर्गत प्रमाणित तूर बियाणे वितरणासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच तूर मिनीकिटसाठी 100 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या लाभासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या सदराखाली अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत अर्ज करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अर्ज प्रक्रियेबाबत किंवा योजनेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित गावातील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी बियाण्यांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.

योजनेचे प्रमुख लाभ

प्रमाणित तूर बियाणे 50 टक्के अनुदानावर उपलब्धतूर मिनीकिट 100 टक्के अनुदानावर उपलब्ध

महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाची सुविधा

राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत लाभ

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून उत्पादनवाढीस चालना

या योजनेमुळे तूर पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासही हातभार लागणार आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande