सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीचा पोलीस महासंचालकं सदानंद दाते यांनी घेतला आढावा
नाशिक, 10 जून (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्या आणि त्या दृष्टिकोनातून नियोजन करा अशा सूचना राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते न
Director General of Police


नाशिक, 10 जून (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्या आणि त्या दृष्टिकोनातून नियोजन करा अशा सूचना राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते नाशिक दौऱ्यावर आले असताना, पोलीस आयुक्तालयात सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजयसिंह येनपुरे , पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील कुंभमेळ्या बाबत असलेल्या बंदोबस्ताच्या नियोजनाची माहिती एका प्रेझेंटेशन द्वारे देण्यात आली. ग्रामीणचे पोलीस अधीक्षक स्वामी यांनी त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या दिवशी कशा स्वरूपाचे बंदोबस्त नियोजन करण्यात येणार आहे याची माहिती प्रेझेंटेशन द्वारे दिली. या सर्व माहितीनंतर राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी मार्गदर्शन करताना काही सूचना केल्या त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा स्वरूपाचे नियोजन करण्याच्या काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी आणि नियोजन करण्याचे देखील सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande