महायुतीचे शिवसेना उमेदवार सईद भैय्या खान यांना भरघोस मतांनी विजयी करा - आ. राजेश दादा विटेकर
परभणी, 10 जून (हिं.स.)। परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश दादा विटेकर यांच्या गावी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव साहेब, आमदार राजेश दादा विटे
महायुतीचे शिवसेना उमेदवार सईद भैय्या खान यांना भरघोस मतांनी विजयी करा - आमदार राजेश दादा विटेकर


परभणी, 10 जून (हिं.स.)। परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश दादा विटेकर यांच्या गावी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीस शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव साहेब, आमदार राजेश दादा विटेकर, पक्षनिरिक्षक पद्माकर मोराडे, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती पदाधिकारी तसेच महायुतीचे विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार राजेश दादा विटेकर यांनी परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महायुती एकसंघ असल्याचे स्पष्ट करत, महायुतीचे शिवसेना उमेदवार सईद भैय्या खान यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. जनहित आणि विकासासाठी महायुतीचे सरकार अधिक बळकट करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande