‘अमृत’तर्फे ‘मानसमित्र’चे मोफत प्रशिक्षण;समुपदेशन क्षेत्रात संधी
छत्रपती संभाजीनगर, 10 जून (हिं.स.)। महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत ‘अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाची पहिल्या बॅचसाठी दि.१५ ते २२ जून या कालावधीत ऑनलाइन अर्
‘अमृत’तर्फे ‘मानसमित्र’चे मोफत प्रशिक्षण;समुपदेशन क्षेत्रात संधी


छत्रपती संभाजीनगर, 10 जून (हिं.स.)।

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत ‘अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाची पहिल्या बॅचसाठी दि.१५ ते २२ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या रूपाने कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत हा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था Maharashtra Institute of Mental Health (MIMH), पुणे ही तांत्रिक भागीदार (Technical Partner) म्हणून कार्यरत राहणार आहे.

हा समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम मानसशास्त्र, समुपदेशन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार, व्यावसायिक विकास आणि समाजोपयोगी कार्याची मोठी संधी उपलब्ध करून देणार आहे.

प्रशिक्षणात समाविष्ट बाबी

विद्यार्थी समुपदेशनाची मूलतत्त्वे, बाल व किशोर मानसिक आरोग्य, संवाद कौशल्ये व सक्रिय श्रवण, तणाव व्यवस्थापन व भावनिक स्वास्थ्य, जीवनकौशल्य शिक्षण, आत्महत्या प्रतिबंध आणि संकट व्यवस्थापन, सायबर सुरक्षा व डिजिटल आरोग्य, पालक व शिक्षकांसोबत समन्वय, मानसिक आरोग्य जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन, शाळा आधारित समुपदेशन व रेफरल प्रणाली

प्रशिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या संधी

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना शाळा व महाविद्यालयीन समुपदेशक,मानसमित्र समुपदेशक,जीवनकौशल्य प्रशिक्षक,मानसिक आरोग्य जनजागृती प्रशिक्षक,पालक व शिक्षक कार्यशाळा समन्वयक,विद्यार्थी कल्याण अधिकारी,स्वयंरोजगाराच्या माध्यमातून समुपदेशन सेवा इ. क्षेत्रात संधी उपलब्ध होऊ शकतात.

कौशल्य विकास प्रशिक्षण

अमृत मानसमित्र अंतर्गत विद्यार्थी समुपदेशकांसाठी विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष समुपदेशन कौशल्ये, केस स्टडी, रोल प्ले, सुपरव्हिजन, मार्गदर्शन आणि क्षेत्रीय अनुभव यांचा समावेश असेल.

प्रशिक्षणाचे स्वरूप

हे प्रशिक्षण ऑफलाईन व ऑनलाईन असे दोन्ही स्वरुपात असेल. १५ दिवस प्रत्यक्ष वर्ग प्रशिक्षण नंतर एक महिन्याची निरीक्षणाधारित क्षेत्रीय नियुक्ती तसेच ऑनलाइन तज्ज्ञ सत्रे व केस चर्चा व सहा महिन्यांचे मार्गदर्शन व सुपरव्हिजन यामुळे कार्यरत व्यावसायिक, विद्यार्थी आणि इतर इच्छुकांना प्रशिक्षणात सहभागी होणे सुलभ होईल.

निवड प्रक्रिया

प्रत्येक जिल्ह्यातील गरज, विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध संसाधनांचा विचार करून प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली जाईल. सर्वसाधारणपणे प्रत्येक बॅचमध्ये किमान २० ते कमाल ३० उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.

पात्रता

शैक्षणिक पात्रता - एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र,एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र,मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW).

डोमिसाईल, उत्पन्नाचा दाखला, जातीचा पुरावा.

प्रशिक्षण स्थळ आणि निवास व्यवस्था

सहा महिन्यांच्या एकूण प्रशिक्षण कार्यक्रमापैकी १५ दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे येथे होणार आहे. या कालावधीतील निवास व भोजनाची व्यवस्था विद्यार्थ्यांनी स्वतः करायची आहे.

मोफत प्रशिक्षण

अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांचा या सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाचा शैक्षणिक खर्च अमृत संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. म्हणजेच पात्र उमेदवारांना हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहे.

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यासाठी अमृत संस्थेच्या अधिकृत (https://mahaamrut.org.in/ ) संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरता येईल.यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. पहिल्या बॅचसाठी अर्जाची मुदत दि.१५ ते २२ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. छाननीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांना ई-मेल अथवा संदेशाद्वारे कळविण्यात येईल. मुदतीत प्रवेश न घेतल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आपल्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाला भेट देऊन जिल्हा व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.

संपर्क पत्ता:- विभागीय व जिल्हा कार्यालय अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर .पि को :४३१००९

संपर्क:- 7391065475 / 9403200606

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande