परभणी - गीता परिवाराच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ; 150 प्रशिक्षार्थींचा सहभाग
परभणी, 10 जून (हिं.स.)। गीता परिवार परभणीच्या त्रिदशक पूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्तदिवसीय निशुल्क लाठी-काठी व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरास येथील शिवाजी महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या शिबिरात महिला, मुली आणि युवकां
गीता परिवाराच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरास उत्साहात प्रारंभ; 150 प्रशिक्षार्थींचा सहभाग


परभणी, 10 जून (हिं.स.)। गीता परिवार परभणीच्या त्रिदशक पूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्तदिवसीय निशुल्क लाठी-काठी व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरास येथील शिवाजी महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या शिबिरात महिला, मुली आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला जात असून सुमारे 140 ते 150 प्रशिक्षार्थी लाभ घेत आहेत.

शिबिराचे उद्घाटन डॉ. दत्तात्रय मगर, ब्रम्हनाथकर सर, कोकीळ सर तसेच गीता परिवार परभणी जिल्हाध्यक्ष सौ. कविताताई मानधने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक सक्षमता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. जयसिंगपूर येथून आलेले प्रशिक्षक श्रीधर, श्रीकृष्ण आणि समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली लाठी-काठी युद्धकला, स्वसंरक्षण तंत्र, निशस्त्र युद्ध, गोपुरम व्यायाम, स्नायू बळकट करणारे विविध व्यायाम तसेच प्रार्थना आदींचे प्रशिक्षण दिले जात आहे. हे संपूर्ण शिबिर सर्वांसाठी निशुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. गत 30 वर्षांपासून गीता परिवार परभणी सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध उपक्रमांद्वारे कार्यरत असून संस्कार वर्ग, प्रशिक्षण शिबिरे आणि मार्गदर्शन सत्रांच्या माध्यमातून युवक, महिला व विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि सकारात्मक संस्कार रुजविण्याचे कार्य करत आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष सौ. कविताताई मानधने, शहराध्यक्ष सौ. माधुरी सराफ, सौ. अनुजा सोमानी, सौ. ज्योती चक्रवार, सौ. मनीषा जेठुरे, सौ. ममता सोनी, सौ. क्रांती हमदापुरकर, सौ. सुनिता मानधने, सौ. अर्चना सोमाणी यांच्यासह गीता परिवाराच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande