परभणी - शासकीय वेतन देयके आता ई-बिल पद्धतीने
परभणी, 10 जून (हिं.स.)। राज्य शासनाच्या शासकीय कार्यालयांमधील वेतन देयके आता ई-बिल पद्धतीने सादर करण्यात येणार असून, त्यासंदर्भात जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने दुसरे प्रशिक्षण सत्र आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोज
शासकीय वेतन देयके आता ई-बिल पद्धतीने; जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण संपन्न


परभणी, 10 जून (हिं.स.)। राज्य शासनाच्या शासकीय कार्यालयांमधील वेतन देयके आता ई-बिल पद्धतीने सादर करण्यात येणार असून, त्यासंदर्भात जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने दुसरे प्रशिक्षण सत्र आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आले.

प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. दत्ता गो. भांगे, कोषागार अधिकारी महेश कुलकर्णी, उपकोषागार अधिकारी मिलिंद झडते, गोपाळ जमदाडे, मुकुंद शिंदे, प्रशांत चौधरी, प्रकाश कोत्तावार, दिलीप थोरात, गणेश गाणार, प्रभाकर सावंत तसेच सेवार्थ तंत्र सहाय्यक अनिकेत पाटील, लेखापाल अशोक माळगे, लेखा लिपीक शोएब मोहम्मद, गजानन कदम, नरसिमलू पचनुरे, रोहिदास काळे यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांतील आहरण व संवितरण अधिकारी आणि वेतन देयकाशी संबंधित कर्मचारी उपस्थित होते.जुन्या सेवार्थ प्रणालीतून नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये स्थलांतराची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जून महिन्याचे वेतन नवीन प्रणालीमध्ये अद्ययावत करून ई-बिल पद्धतीने सादर करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. नवीन सेवार्थ प्रणालीचा वापर आणि ई-बिल प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन सेवार्थ तंत्र सहाय्यक अनिकेत पाटील यांनी केले.सर्व संबंधित विभागांनी नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये स्थलांतराची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. दत्ता भांगे यांनी केले.या प्रशिक्षणामुळे जून देय जुलै महिन्याचे वेतन देयक नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये ई-बिल पद्धतीने सादर करणे शक्य होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande