छ. संभाजीनगर - शासकीय वेतन देयके आता ई-बिल पद्धतीने
छत्रपती संभाजीनगर, 10 जून (हिं.स.)। शासकीय कार्यालयातील वेतन देयके आता ई-बिल पद्धतीने करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने प्रशिक्षण सत्र जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व राज्य शासन कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी तसेच वेतन देयकाशी संबंधित कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मंजित गोरेगावकर यांनी केले आहे.

या प्रशिक्षणामुळे जून देय जुलै महिन्याचे वेतन देयक नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये ई-बिल पद्धतीने सादर करणे शक्य होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

 rajesh pande