
रत्नागिरी, 15 जून (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात आज 15 जून रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरासरी 66.५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ सुमारे 20 टक्के पावसाची नोंद यावर्षी झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्यावर्षी 15 जूनपर्यंत ३०१.५५, तर यावर्षी केवळ 66.५५ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी या काळात सर्वाधिक ३४९.४० मिलिमीटर नोंद लांजा तालुक्यात झाली होती. यावर्षी आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 159.८५ मिमी पाऊस आजच्या तारखेपर्यंत पडला आहे. त्याखालोखल गुहागर तालुक्यात सरासरी १४२.२० मिमी पाऊस पडला. अन्य सर्व तालुक्यांमध्ये पावसाने शंभरीही गाठलेली नाही. मंडणगड तालुक्याकडे तर पावसाने पाठच फिरविली आहे. तेथे आजपर्यंत केवळ ८.75 मिलिमीटर या नीचांकी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्याला अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षाच आहे. पावसाअभावी शेतीची कामे रखडली आहेत. पडलेल्या पावसाचा फायदा घेऊन भाताची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. अत्यंत तुरळक स्वरूपात पडणाऱ्या पावसामुळे ही पेरणी तगून आहे. मात्र अजूनही पाऊस पडला नाही तर पुन्हा पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.
रत्नागिरीतील 15 जूनपर्यंतचे तालुकानिहाय पर्जन्यमान
दापोली 28.२४
खेड २१.३१
चिपळूण ४०.96
संगमेश्वर 50.54
लांजा 70.76
राजापूर ७६.४९
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी