
मतदार यादी पुनरीक्षण व संघटनात्मक समन्वयावर सविस्तर चर्चा
छत्रपती संभाजीनगर, 15 जून (हिं.स.) : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील स्पेशल इनव्हिस्टिगेशन रिव्हीजन (एसआयआर) अभियानाच्या अनुषंगाने पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपर्क कार्यालयात पार पडली.
बैठकीत एसआयआर अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना, मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत कार्यकर्त्यांची भूमिका, संघटनात्मक समन्वय तसेच आगामी कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अभियान यशस्वी करण्यासाठी आवश्यक सूचना देत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. भागवत कराड यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी आणि त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश दिले.
बैठकीस विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis