परभणी - बोगस मतदारांची नावे तात्काळ वगळण्याची मागणी
परभणी, 10 जून (हिं.स.)। मतदार पुनर्परीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील बोगस नावे शोधून तात्काळ वगळावीत तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांच्याक
परभणी - बोगस मतदारांची नावे तात्काळ वगळण्याची मागणी


परभणी, 10 जून (हिं.स.)। मतदार पुनर्परीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील बोगस नावे शोधून तात्काळ वगळावीत तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांच्याकडे करण्यात आली. माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

सेलू तालुक्यात शिक्षण, नोकरी किंवा मजुरीच्या निमित्ताने इतर जिल्हे तसेच परराज्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. अशा काही व्यक्तींची नावे त्यांच्या मूळ गावाच्या मतदार यादीत असतानाच जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघाच्या यादीतही असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा नावांची सखोल पडताळणी करून बोगस मतदारांची नावे तात्काळ कमी करण्यात यावीत. अनोळखी मतदारांची शहानिशा करणे, विवाहित महिलांची नावे माहेर आणि सासर अशा दोन्ही ठिकाणी असल्यास ती एकाच ठिकाणी ठेवणे, 2002 च्या मतदार यादीच्या आधारे नव्या मतदारांच्या नोंदींची पडताळणी करणे, एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी असल्यास त्याची दुरुस्ती करणे, मयत मतदारांची नावे वगळणे तसेच आधारकार्डाच्या आधारे मतदारांची पडताळणी करून बोगस नोंदी रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी पुरुषोत्तम पावडे, प्रकाशराव मुळे, चंद्रकांत गाडेकर, प्रशांत नाईक, जीवन आवटे, सुधाकर रोकडे, शुभम कदम, दिलीप शेवाळे, अनिरुद्ध नाईक, रामेश्वर गाडेकर, बालाप्रसाद राठोड, मदनराव पवार, शिवाजी गिनगीने, श्रीधर गिनगीने, संजय बहिरट, शामराव डख, कौतिक कुलकर्णी, मनोज गाडेकर, बाळासाहेब मुसळे, प्रविण महाजन, सुभाष वायगुंडे, सर्जेराव शेरे, अशोक पवार, हरीभाऊ सपाटे, सुनील रोडगे, संतोष मोहरीर, बाळासाहेब जावळे, शेख नाजर, ओम कदम, गुलाबराव गाडेकर, मजितभाई बागवान, भागवत बालटकर, गजानन कोरडे, लक्ष्मण खरात, दीपक गाडेकर, वैजनाथ कोरडे, गजानन घोडके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande