मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण
मुंबई, 10 जून (हिं.स.) - उत्तर-पश्चिम जनतेने नगरसेवक, आमदार व आता खासदार म्हणून माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याला सार्थ ठरवण्यासाठी पायाभूत सुविधा भक्कम करतानाच परिसराचे सौंदर्य टिकवण्याबरोबरच त्यात अधिक भर घालण्यासाठी लोकसभा क्षेत्रात विविध अभिन
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण


मुंबई, 10 जून (हिं.स.) - उत्तर-पश्चिम जनतेने नगरसेवक, आमदार व आता खासदार म्हणून माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याला सार्थ ठरवण्यासाठी पायाभूत सुविधा भक्कम करतानाच परिसराचे सौंदर्य टिकवण्याबरोबरच त्यात अधिक भर घालण्यासाठी लोकसभा क्षेत्रात विविध अभिनव विकास काम तसेच सौदार्यीकरण कामांचा खासदार यांनी धडाका लावला असून याचाच एक भाग म्हणून लोकसभा क्षेत्रातील विकास कामांचे लोकार्पण शिवसेना मुख्यनेते तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवार ११ जून २०२६ रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे.

खासदार रविंद्र वायकर यांनी गेल्या काही महिन्यांत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण विकासकामे हाती घेतले होती. यात आरे चेक नाका, गोरेगाव (पूर्व) पश्चिम द्रुतगती महामार्ग येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये बाधित होणाऱ्या पहिल्या टप्यातील सर्वोदय नगर मधील सुमारे ७० रहिवाश्यांना घराच्या चाव्यांचे वाटप, इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसर, श्याम नगर तलाव, जोगेश्वरी (पूर्व), संतांची महती सांगणारी भिंतीचीत्रे त्यांच्या माहितीसाहित जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील श्याम नाग तलाव, येथे साकारण्यात आली आहेत, एम.एम.आर.डी.ए, दुर्गा नगर, येथे मेट्रो डब्याच्या आकाराचे उभारलेले वाचनालय तसेच हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रामा मनपा रुग्णालयाजवळ उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय सार्वजनिक प्रसाधन, स्वच्छता गृह, सेवा सुविधा केंद्र याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सुविधा केंद्रात महिला व पुरुष शौचालयाबरोबरच, कपडे धुण्याची, सुकवण्याची, अंघोळीची, रात्री झोपण्यासाठी सुमारे ३२ बंकर बेड, लहान मुलांना दुध पाजण्यासाठी हिरकणी कक्ष, कपड्यांना इस्त्री करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या लोकार्पण कार्यक्रमाची सुरुवात ट्रोमा रुग्णालय येथील लोकार्पण कार्यक्रमापासून होणार सायंकाळी ५ वाजल्यानंतर होणार आहे . उत्तर-पश्चिम मुंबईतील या विकास सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande