डोबिवली: लिव्हर ट्रान्सप्लांट जीवनाला नवी संधी देणारा पर्याय-डॉ. वर्मा
डोंबिवली, 10 जून (हिं.स.) : लिव्हरचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा लक्षणांशिवाय वाढत असल्याने नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, मद्यपानावर नियंत्रण आणि वेळेवर उपचार यांना विशेष महत्त्व दिले पाहिजे. गंभीर यकृतविकार रुग्णांसाठी लिव्हर ट्रान्सप्
Ph1


डोंबिवली, 10 जून (हिं.स.) : लिव्हरचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा लक्षणांशिवाय वाढत असल्याने नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, मद्यपानावर नियंत्रण आणि वेळेवर उपचार यांना विशेष महत्त्व दिले पाहिजे. गंभीर यकृतविकार रुग्णांसाठी लिव्हर ट्रान्सप्लांट जीवनाला नवी संधी देणारा पर्याय आहे असे वक्तव्य सर्जिकल गैस्ट्रोएंटरोलॉजीस्ट डॉ. विभा वर्मा यांनी केले. लिव्हरचे आजार याविषयावर डॉ. वर्मा यांनी महत्वाची माहिती दिली.

डोंबिवलीतील यकृतविकार रुग्णांना आता मुंबईत जायची गरज नाही. डॉ. वर्मा यांच्या निर्देशाखाली नवीन ओपीडी डोंबिवलीत लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.त्यांनी सांगितले की, डोळे व त्वचा पिवळी पडणे (कावीळ), पायांमध्ये सूज येणे, पोटात पाणी साचणे (असाइटिस), रक्ताची उलटी होणे किंवा शौचातून रक्त जाणे, काळ्या रंगाचा मल, वजन झपाट्याने कमी होणे, सतत थकवा व अशक्तपणा, वारंवार ताप येणेजास्त झोप येणे किंवा गोंधळलेपणा, श्वास घेण्यास त्रास होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दुर्लक्षित करू नका. कारण लिव्हर निकामी होण्याची काही महत्त्वाची लक्षणे असतात. कारण योग्य निदान आणि उपचार केल्यास लिव्हरबाबतची गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.

यकृत या विषयी विस्तृत माहिती देणारा पुढे सांगीतले की, यकृत हा आपल्या मानवाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे. पोटाच्या वरच्या उजव्या भागात असतो. यामुळे पचन, ऊर्जा साठवण आणि विषारी पदार्थ बाहेर टाकणे अशा प्रकारची शेकडो कार्ये होत असतात.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande