पंतप्रधान मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त लातूरमध्ये महाआरती
लातूर, 10 जून (हिं.स.)। : देशाचे पंतप्रधान यांच्या १२ वर्षांच्या यशस्वी व जनकल्याणकारी कारकिर्दीनिमित्त लातूर शहरातील जागृत देवस्थान असलेल्या येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते म
पंतप्रधान नरेंद्र मोदी


लातूर, 10 जून (हिं.स.)।

: देशाचे पंतप्रधान यांच्या १२ वर्षांच्या यशस्वी व जनकल्याणकारी कारकिर्दीनिमित्त लातूर शहरातील जागृत देवस्थान असलेल्या येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. देशाच्या प्रगतीसाठी, सुशासनासाठी आणि जनकल्याणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

या कार्यक्रमास खासदार अशोक चव्हाण, विधान परिषद निवडणूक निरीक्षक संजय कौडगे, प्रदेश उपाध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, निलंगा नगराध्यक्ष संजयराज हलगरकर, मनपा विरोधी पक्षनेते देवीदास काळे तसेच मंदिर प्रशासक सचिन जांबुतकर, मंदिर विश्वस्त बाबासाहेब कोरे आदींसह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रहित, विकास आणि जनकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande