परभणी - कै. अनंत कातनेश्वरकर स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात
परभणी, 10 जून (हिं.स.)। शिक्षणाचा थेट संबंध वर्तनाशी असून शिक्षणामुळे व्यक्तीच्या आचार-विचारांमध्ये सकारात्मक बदल घडणे आवश्यक आहे. जगण्याची कला अवगत होणे हेच खर्या शिक्षणाचे यश असल्याचे प्रतिपादन परभणी भूषण डॉ. रामेश्वर नाईक यांनी केले.
कै. अनंत कातनेश्वरकर स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थी गौरव व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात


परभणी, 10 जून (हिं.स.)। शिक्षणाचा थेट संबंध वर्तनाशी असून शिक्षणामुळे व्यक्तीच्या आचार-विचारांमध्ये सकारात्मक बदल घडणे आवश्यक आहे. जगण्याची कला अवगत होणे हेच खर्या शिक्षणाचे यश असल्याचे प्रतिपादन परभणी भूषण डॉ. रामेश्वर नाईक यांनी केले.

कै. अनंत कमलाकरराव कातनेश्वरकर स्मरणार्थ आयोजित गुणगौरव व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ऑडिट व विश्वास नगर येथे मागील 25 वर्षांपासून कै. अनंत कमलाकरराव कातनेश्वरकर यांच्या स्मरणार्थ दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याची परंपरा जपली जात आहे. यंदा या उपक्रमाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटनेते विजयराव जामकर होते. यावेळी दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच परभणी भूषण डॉ. रामेश्वर नाईक यांना ज्ञान-विज्ञान-सेवाभाव हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगरातील नागरिकांनी त्यांना सन्मानपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली. या सन्मानपत्राचे शब्दांकन ड. रवींद्र कातनेश्वरकर यांनी केले होते. कार्यक्रमात मागील 24 वर्षांपासून या उपक्रमासाठी मोलाचे योगदान देणारे समाजसेवक मोबीनभाई गाझी यांच्या सन्मानपत्राचेही वाचन करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून नगरसेवक बाळासाहेब बुलबुले, अर्जुन सामाले तसेच निवृत्त मुख्याध्यापक आनंदी देशमुख उपस्थित होते. आनंदी देशमुख यांनी कै. अनंत कातनेश्वरकर यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्याचा व सामाजिक योगदानाचा आढावा घेत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. अध्यक्षीय समारोपात विजयराव जामकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आजच्या स्पर्धात्मक युगात पालकांवर वाढणार्या ताणाचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील वर्षांपासून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. भक्ती रवींद्र कातनेश्वरकर यांनी केले. आदर्श शिक्षक हेमंत शेवाळकर यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर कथा लेखिका सौ. सरोज देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत भानप, अभय नाईक, प्रकाश चौधरी, हेमंत शेवाळकर, रवींद्र कातनेश्वरकर, डॉ. सुधाकर जगताप, नामदेव कुंभारे, सुरेश किंगरे यांच्यासह नगरातील अनेक नागरिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande