
छत्रपती संभाजीनगर, 10 जून (हिं.स.) | भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम, दूरदर्शी आणि जनहितवादी नेतृत्वाखाली देशाने विकास, सुशासन, राष्ट्रीय सुरक्षा, पायाभूत सुविधा, गरीब कल्याण आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने अभूतपूर्व प्रगती साधली आहे. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभावी या सदिच्छेने भारतीय जनता पार्टी, जालना जिल्ह्याच्या वतीने बदनापूर येथील श्री बालाजी मंदिरात महापूजा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, सर्वसामान्य जनतेच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकरी, कामगार, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी तसेच विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी प्रार्थना करण्यात आली. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात महाआरती संपन्न झाली.
या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस अनिलराव कोलते पाटील, तालुकाध्यक्ष भगवान म्हात्रे, नगरसेवक पद्माकर जराड यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राने प्रेरित होऊन विकसित भारताच्या निर्मितीसाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे कार्य करूया, हा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis