अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
अमरावती, 10 जून (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27 वा वर्धापन दिन आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या रेल्वे स्टेशन चौक येथील जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पक्षाला गतवैभव प्राप्त करून देत सर्वसामान्य कार्यकर्त्यां
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 27 वा वर्धापन दिन साजरा


अमरावती, 10 जून (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27 वा वर्धापन दिन आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या रेल्वे स्टेशन चौक येथील जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पक्षाला गतवैभव प्राप्त करून देत सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर पक्षध्वजाचे ध्वजारोहण करून उपस्थितांनी मानवंदना दिली.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासात, तसेच शेतकरी, युवक आणि सामाजिक न्यायासाठी पक्षाने दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि प्रदेश महासचिव आमदार संजय खोडके यांच्या मार्गदर्शनाचाही उल्लेख करण्यात आला.कार्यक्रमात यश सुलभा संजय खोडके यांनी उपस्थितांचे आभार मानत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला महिला आघाडी, युवक-युवती, विद्यार्थी, किसान, अल्पसंख्यांक, शिक्षक, क्रीडा, सांस्कृतिक व विविध सेलचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande