सोलापूर - ग्रामीण उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणार : सुभाष देशमुख
सोलापूर, 10 जून (हिं.स.) “लोकल ते ग्लोबल आणि ग्लोबल ते लोकल” या संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करून स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रतिपादन दक्षिण स
Subhash deshamukha


सोलापूर, 10 जून (हिं.स.) “लोकल ते ग्लोबल आणि ग्लोबल ते लोकल” या संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करून स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रतिपादन दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

होटगी, आहोळवाडी, बोरामणी, बसवनगर, निंबर्गी, भांडारकवठे, कंदलगाव, तिळे आणि बेलाटी येथे आयोजित व्यावसायिक व स्वयंरोजगार संवाद बैठकीत त्यांनी उद्योजक, महिला बचत गट, युवक-युवती, दुकानदार तसेच लघु आणि मध्यम व्यावसायिकांशी थेट संवाद साधला.यावेळी महिला उद्योजकता, दुग्ध व्यवसाय, किरकोळ व्यापार, सेवा क्षेत्र, शेतीपूरक उद्योग आणि ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या संसाधनांचा प्रभावी वापर करून नवीन उद्योग व व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.ग्रामीण भागातील महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी तसेच युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतील, असेही आमदार देशमुख यांनी सांगितले.गावागावांत अशा संवाद बैठका नियमितपणे घेऊन स्थानिक उद्योग, व्यवसाय आणि उद्योजकांच्या अडचणी जाणून घेण्यात येतील. त्याचबरोबर त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.ग्रामीण भागातील उद्योजकता वाढवून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि रोजगारनिर्मितीला गती देणे हेच या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande