वंदे मातरमच्या इतिहासावर सिध्दाराम पाटील यांचे रविवारी सोलापूरात व्याख्यान
सोलापूर, 10 जून (हिं.स.)। देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्वाचे गीत ठरलेल्या वंदे मातरमचा लपलेला इतिहास आणि काही महत्वाच्या घटनाबाबत पत्रकार सिध्दाराम पाटील यांचे व्याख्यान रविवार दि. 14 जून रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य टिळक सभागृह अॅम्फी थिएटर मध्य
वंदे मातरमच्या इतिहासावर सिध्दाराम पाटील यांचे रविवारी सोलापूरात व्याख्यान


सोलापूर, 10 जून (हिं.स.)। देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्वाचे गीत ठरलेल्या वंदे मातरमचा लपलेला इतिहास आणि काही महत्वाच्या घटनाबाबत पत्रकार सिध्दाराम पाटील यांचे व्याख्यान रविवार दि. 14 जून रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य टिळक सभागृह अॅम्फी थिएटर मध्ये होणार असल्याची माहिती महाराष्ट साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष रेणुका महागावकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार राहणार आहेत. नुकतेच राज्यस्तरीय वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवणारी शाखा म्हणून पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेने दक्षिण सोलापूर शाखेला पुरस्काराने गौरवलेले आहे. त्यानंतर हा राष्ट्रप्रेमावरील वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मातृभूमीला आईचा दर्जा देवून तिची पूजा करण्याची भावना व्यक्त करणार्या वंदे मातरमचा इतिहास मोठा रंजक आहे. प्रखर राष्ट्रभक्त बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1870 मध्ये बंगाली भाषेत वंदे मातरम कविता लिहली. त्यानंतर आनंदमठ या कादंबरीमध्ये त्याचा समावेश केला. थोर स्वातंत्र्य सेनानी कवी रविंद्रनाथ टागोर यांनी 1896 रोजी झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनात सर्वप्रथम ही वंदेमातरम कविता सादर केली तेव्हापासून स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा ठरलेल्या वंदेमारतने देशात क्रांती केली आणि देश स्वातंत्र्य होण्यासाठी वंदे मातरम या गीताची प्रेरणा ठरली. नुकतेच वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्या नंतर भारताचे राष्ट्रीय गीत ठरलेल्या या वंदे मातरमचा लपलेला इतिहास काय आहे.

याबाबत पत्रकार आणि युवा अभ्यासक सिध्दाराम पाटील आपल्या व्याख्यानातून माहिती देणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतात त्यातूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या आपल्या देशाच्या राष्ट्रीय गीताचा इतिहास जाणून घेण्यासाठी नव्या पिढीने कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande