रत्नागिरी जिल्ह्यात 21 ते 23 ऑगस्ट कालावधीत विशेष लोकअदालती
रत्नागिरी, 10 जून (हिं.स.) ।सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकाराने समाधान समारोह 2026 अंतर्गत, 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा
रत्नागिरी जिल्ह्यात 21 ते 23 ऑगस्ट कालावधीत विशेष लोकअदालती


रत्नागिरी, 10 जून (हिं.स.) ।सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकाराने समाधान समारोह 2026 अंतर्गत, 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, विनोद वाय. जाधव तसेच जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी केले आहे.

समाधान समारोह उपक्रमांतर्गत प्रकरणे संदर्भित करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांच्याकरिता आपली प्रकरणे एकमेकांच्या समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरिता ही एक सुवर्णसंधी सर्वोच्च न्यायालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. याचा लाभ घेऊन तडजोडपात्र प्रकरणे या विशेष लोकअदालतीमध्ये तडजोडीने सोडविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा.

विशेष लोकअदालतीबाबतच्या माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ८५९१९०३६०८ या मोबाइल क्रमांकावर किंवा ०२३५२-२२४७६८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

पक्षकारांना तसेच प्रकरणातील वकिलांना आभासी व्यासपीठाद्वारे या विशेष लोकअदालतीमध्ये उपस्थित राहता येईल. त्यामुळे पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे सामंजस्याने सोडवावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले आहे.

विशेष लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणांचा परस्पर संमतीने जलद निपटारा करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे देशभरातील वाद प्रकरणे मध्यस्थी व तडजोडीच्या माध्यमातून सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सहभागी न्याय आणि न्याय आपल्या दारी या संकल्पांना बळ देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. या विशेष लोकअदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा उपक्रम 21 एप्रिलपासून सुरू झाला असून ऑगस्ट महिन्यातील विशेष लोकअदालतीद्वारे त्याचा समारोप होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande