मांजरा साखर कारखान्याकडून गळीत हंगामातील उसाच्या अंतिम हप्त्याचे बिल जमा
लातूर, 10 जून (हिं.स.)। राज्यातील सहकारी साखर कारखानदारीत केवळ राज्य नाही तर देश पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या लातूर तालुक्यातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमु
मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना


लातूर, 10 जून (हिं.स.)।

राज्यातील सहकारी साखर कारखानदारीत केवळ राज्य नाही तर देश पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या लातूर तालुक्यातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाला.

ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

मांजरा परिवरातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासाठी गळीत हंगाम 2025- 26 साठी सहकार महर्षी श्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी किमान एफ आर पी रुपये 3150 प्रति मॅट्रिक टन इतकी जाहीर केली होती, कारखान्याने यापूर्वी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना रुपये 2850/-प्रति मेट्रिक टन प्रमाणे ऊस बिल अदा केलेल आहे,ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना एफआरपी पैकी रुपये 327.62 प्रति मेट्रिक टन प्रमाणे अंतिम ऊस बिल कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्या आदेशाने दिनांक 10/06/ 2026 रोजी ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे. तसेच आपल्या संबंधित बँक शाखेची संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.

मांजरा परिवाराची परंपरा कायम

देशमुख यांनी जाहीर केलेल्या किमान रुपये 3150 प्रति मॅट्रिक टन ऊस दरापेक्षा जास्तीचा ऊस दर रुपये 3177.62 प्रति मॅट्रिक टन इतका देऊन मांजरा परिवाराची परंपरा कायम राखली आहे. गळीत हंगाम 2025-26 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 227 कोटी 32 लाख 97 हजार 946 इतकी रक्कम मांजरा कारखान्याकडून वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande