रत्नागिरी : ग्राहक आयोगाचे कामकाज सुरळितपणे सुरू
रत्नागिरी, 10 जून (हिं.स.) ।ग्राहक आयोगाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली असून ती पूर्णपणे चुकीची आहे. इमारतीच्या अर्ध्या भागात कामकाज सुरळित सुरू आहे. ग्राहक आयोगाच्या संपूर्ण कार्यालयाचे नूतनीकरण एकाच वेळी न करता सध्या अ
रत्नागिरी : ग्राहक आयोगाचे कामकाज सुरळितपणे सुरू


रत्नागिरी, 10 जून (हिं.स.) ।ग्राहक आयोगाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली असून ती पूर्णपणे चुकीची आहे. इमारतीच्या अर्ध्या भागात कामकाज सुरळित सुरू आहे.

ग्राहक आयोगाच्या संपूर्ण कार्यालयाचे नूतनीकरण एकाच वेळी न करता सध्या अर्ध्या भागात (कोर्ट हॉल, अध्यक्ष व सदस्य यांचे कक्षात तसेच टेरेसवर ) सुरू आहे. त्यामुळे राहिलेल्या अर्ध्या भागात अॕडमिशन हिअरिंग, कागदपत्रे दाखल करून घेणे, नोटिसा पाठवणे इत्यादी सर्व कामे सुरळीतपणे सुरु असल्याची माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या प्र. प्रबंधकांनी दिली आहे.

सद्य:स्थितीत रत्नागिरी जिल्हा आयोग कार्यालयाच्या नूतनीकरण सुरू असल्याने कामकाज पूर्ण होईपर्यंत दाखल सुनावणी व जाहीर करण्याची निकाली प्रकरणे (Admission Hearing & Pronouncement Order) वगळून दैनंदिन बोर्ड दि.4 मे 2026 पासून पुढील तीन आठवडे डिस्चार्ज करण्याची परवानगी देण्यात आली होती. ही बाब आयोगाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली होती. त्यानंतर दि.25 मे 2026 पासून पुढील तीन आठवडे दैनंदिन बोर्ड डिस्चार्ज करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

प्रत्यक्षात रत्नागिरी आयोगाचे कामकाज पक्षकारांची गैरसोय होणार नाही याची व्यवस्थित दक्षता घेऊन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या निर्देशानुसार सुरळितपणे चालू आहे. ग्राहक आयोगाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे, अशी खोटी व दिशाभूल करणारी बातमी पूर्णपणे चुकीची आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande