
ठाणे, 10 जून (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तपपूर्तीनिमित्ताने भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी गांवदेवी मंदिरात महाआरतीचा गजर केला. भाजपचे कार्यकर्ते व नागरिकांनी भक्तीभावाने भव्य आरती म्हणत शंखनाद व टाळ-मृदंगाचा गजर केल्याने वातावरण भक्तीमय झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान म्हणून गौरव प्राप्त केला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभण्याबरोबरच उज्ज्वल भविष्यासाठी महाआरती करण्याची सूचना भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली होती. त्यानुसार नौपाड्यातील गोखले रोडवरील गांवदेवी मंदिरात भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या हस्ते आज सकाळी १० वाजता महाआरतीला सुरुवात करण्यात आली.
ठाण्याचे ग्रामदेवत असलेल्या श्री गांवदेवी मंदिराला १२५ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गांवदेवी मंदिराच्या माध्यमातून ठाण्याच्या धार्मिक, सांस्कृतिक इतिहासाची प्रचिती मिळते. अशा प्रसन्न वातावरण असलेल्या श्री गांवदेवी मंदिरात महाआरतीला उत्साहात सुरूवात झाली. श्री गणेशासह विविध आरत्या कार्यकर्त्यांनी म्हटल्या. आरती आटोपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गांवदेवीकडून आशीर्वाद मागण्यात आला.
या महाआरतीत भाजपचे नौपाडा मंडल अध्यक्ष रोहित गोसावी, महिला मोर्चाच्या मंडल अध्यक्ष वृषाली वाघुले, विकास घांगरेकर, राजेश जाधव, राजेश ठाकरे, प्रशांत कलंबटे, सागर पिसाळ, अमित वाघचौरे, गौरव अंकोला, अजय सिंह, राकेश कटारिया, विनय नाईक, ज्ञानेश्वर अंदुरे, कमलेश आचार्य, बाळकृष्ण शिंपी, जगदीश मोहिते, राजेश सिनलकर, मनोज शुक्ला, सई कारुळकर, रंजना भंडारे, संहिता देव, क्षमा पातकर, भक्ती मोहिते, वैशाली विधाटे, राणी क्षीरसागर, मधुरा जोगळेकर, शिल्पा उतेकर, विशाखा कणकोसे, कल्याणी वाघमारे, मेधा निकम यांच्यासह माऊली भजनी मंडळाच्या सदस्या सहभागी झाल्या होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर