नाशिक - गिरीश महाजन घेणार रिंगरोडप्रश्नी मॅरेथॉन बैठक
नाशिक, 12 जून (हिं.स.)। तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कुंभ मेळा मंत्री गिरीश महाजन यांची छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी प्रतिनिधी मंडळाने भेट घेतली. यावेळी ना. म
Girish Mahajan to hold


नाशिक, 12 जून (हिं.स.)। तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कुंभ मेळा मंत्री गिरीश महाजन यांची छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी प्रतिनिधी मंडळाने भेट घेतली. यावेळी ना. महाजनांनी रिंगरोडप्रश्नावर एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय अधिकारी, नाशिक जिल्हाधिकारी आणि रिंग रोड बाधित शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त मॅरेथॉन बैठक घेऊन सर्वांना न्याय मिळेल असा सुवर्णमध्य काढण्याची ग्वाही दिली.

बैठकीदरम्यान शेतकरी प्रतिनिधींनी नाशिक जिल्हा प्रशासन व एमएसआरडीसी प्रशासनाकडून रिंग रोडच्या अलाइनमेंट संदर्भात झालेल्या त्रुटी, चुकीच्या पद्धतीने निश्चित करण्यात आलेले मोबदल्याचे दर, तसेच शेतकरी व मंत्री स्तरावर करण्यात आलेल्या दिशाभूल याबाबत ना. महाजनांना सविस्तर निवेदन देण्यात आले. यावर सकारात्मक भूमिका घेत नामदार गिरीश महाजन यांनी पुढील दोन ते

तीन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व आदेश देण्याचे आश्वासन दिले. मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले की, कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. कोणालाही विनाकारण बेघर केले जाणार नाही. शासनाने आतापर्यंत तयार केलेल्या चार अलाइनमेंटपैकी गवळवाडीसह कमीत कमी घरे, विहिरी व शेती बाधित होणार नाही असा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी पुढील बैठकीत सर्व संबंधित पक्षांसोबत चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, युवक प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग, वैभव दळवी, शेतकरी प्रतिनिधी दीपक हगवणे आदींसह मोठ्या संख्येने रिंग रोड बाधित शेतकरी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande