
नांदेड, 13 जून (हिं.स.)।
अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त म. राज्य तुकाराम मुंडे यांचे आदेशाने व अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (अन्न), छत्रपती संभाजी नगर श्रीकांत करकाळे यांचे मार्गदर्शनाखाल नांदेड कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न ) रा.मा. भरकड व अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री संतोष कनकावाड, ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे, अविनाश गिरी, श्रीमती शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे, नमुना सहायक बालाजी सोनटक्के यांनी बारड ता.मुदखेड जि.नांदेड या गावी एकूण 7 विविध दुध संकलन केंद्राची तपासणी करून एकून 13 दुध व दुग्धजन्य पदार्थाचे नमुने घेवून ते तपासणीस्तव प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणीस्तव घेण्यात आलेले एकून 13 नमुने पैकी गायीचे दुधाचे -5 नमुने, म्हशीचे दुधाचे - 6 नमुने, पनीर- 1 नमुना व दही - 1 नमुना आहेत.
तसेच तपासणी दरम्यान एका पेढीकडे नोंदणी प्रमाणपत्र नसल्याने त्या पेढीस नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त होईपर्यंत व्यवसाय बंद करणे बाबत आदेशित करण्यात आलेले आहेत अशी माहिती, सहायक आयुक्त (अन्न ) रा.मा. भरकड यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis