मराठवाड्यातील पहिल्या होमिओ-हर्बल औषध प्रकल्पाचे शनिवारी उद्घाटन
परभणी, 12 जून (हिं.स.)। मराठवाड्यातील पहिल्या आणि एकमेव एफडीए (अन्न व औषध प्रशासन) मान्यताप्राप्त होमिओ-हर्बल औषध निर्मिती कंपनी ‘इरुक्सा होमिओ हर्बल फार्मा (ओपीसी) प्रा. लि.’च्या भव्य प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा शनिवार 13 जून रोजी सकाळी 11 वाजता गंगा
मराठवाड्यातील पहिल्या होमिओ-हर्बल औषध प्रकल्पाचे शनिवारी उद्घाटन


परभणी, 12 जून (हिं.स.)। मराठवाड्यातील पहिल्या आणि एकमेव एफडीए (अन्न व औषध प्रशासन) मान्यताप्राप्त होमिओ-हर्बल औषध निर्मिती कंपनी ‘इरुक्सा होमिओ हर्बल फार्मा (ओपीसी) प्रा. लि.’च्या भव्य प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा शनिवार 13 जून रोजी सकाळी 11 वाजता गंगाखेड तालुक्यातील मौजे सुनेगाव (सा.) येथे आयोजित करण्यात आला आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा आरोग्य व ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर राहणार आहेत. तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय जाधव, माजी खासदार फौजिया खान, शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील आणि आमदार राजेश विटेकर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

गंगाखेड-परभणी मार्गावरील सुनेगाव रोडवर, मुख्य रस्त्यापासून सुमारे 500 मीटर अंतरावर हा प्रकल्प उभारण्यात आला असून उद्घाटन सोहळ्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मराठी उद्योजकतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार्या या ऐतिहासिक सोहळ्यास नागरिक, उद्योजक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कंपनीचे संचालक डॉ. संजय पवार, आशा पवार, डॉ. सुशांत पवार, डॉ. स्वप्नजा पवार आणि इंजि. वरद पवार यांनी केले आहे. 38 प्रकारच्या उत्पादनांसह ग्रामीण युवकांना रोजगाराची संधी कंपनीचे संचालक डॉ. संजय वामनराव पवार यांच्या 28 वर्षांच्या होमिओपॅथिक वैद्यकीय अनुभवातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

कंपनीने सध्या 38 प्रकारची होमिओपॅथिक व हर्बल उत्पादने विकसित केली असून संशोधनाधारित औषध निर्मितीवर विशेष भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा उद्योग पूर्णपणे ग्रामीण भागात उभारण्यात आल्याने स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. प्रकल्पात औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी स्वतंत्र बोटॅनिकल गार्डनही विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे औषध निर्मिती, संशोधन आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या तिन्ही क्षेत्रांना चालना मिळणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande