कुणबी प्रमाणपत्र हेल्पलाईन 1077 बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती!
बीड, 14 जून (हिं.स.)। मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा तसेच कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभा
कुणबी प्रमाणपत्र हेल्पलाईन 1077 बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती!


बीड, 14 जून (हिं.स.)।

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा तसेच कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दि. 02 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन पात्र व्यक्तींना संबंधित जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

कुणबी जात प्रमाणपत्र व जात पडताळणीसंदर्भातील अडचणी, मार्गदर्शन आणि सहाय्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे 1077 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.

पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत.

काही अडचण असल्यास त्वरित संपर्क साधा :

हेल्पलाईन क्रमांक : 1077

असे आवाहन करण्यात आले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande