
रायगड, 14 जून (हिं.स.)। मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आला. कुलस्वामिनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या सौजन्याने तसेच गोरेगाव शहरप्रमुख रोहित रातवडकर यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपकरणामुळे आरोग्य केंद्रातील रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांमध्ये मोठा दिलासा मिळणार असून आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर तसेच युवासेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजोपयोगी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी लोकसहभागातून अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना त्वरित ऑक्सिजन उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)