
बीड, 14 जून (हिं.स.)
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी माजलगाव येथे विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी व मतदार बांधवांच्या भेटी घेत संवाद साधला. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवर, विकासाच्या विविध विषयांवर तसेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली.
मतदार बांधवांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा, सूचना आणि शुभेच्छा यामुळे अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळाली. सर्वांनी व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार त्यांनी व्यक्त केले.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचा सक्षम आणि प्रभावी आवाज विधानपरिषदेत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध! असल्याचे उमेदवार महेश माणिकराव देशमुख यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis