तुळजापूर- नागपुर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू
लातूर, 14 जून (हिं.स.)। तुळजापूर- नागपुर महामार्गावर बुधोडाजवळ भीषण अपघात; भरधाव क्रेटाची क्रुझरला धडक, एकाचा मृत्यू : तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जख
अपघात


लातूर, 14 जून (हिं.स.)।

तुळजापूर- नागपुर महामार्गावर बुधोडाजवळ भीषण अपघात; भरधाव क्रेटाची क्रुझरला धडक, एकाचा मृत्यू

: तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधोड्याजवळ ही दुर्दैवी घटना घडली असून, या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १४ जून) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगाने येणारी 'क्रेटा' कारने 'क्रुझर' गाडीवर पाठिमागुन आदळल्याने बुधोड्याजवळ जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.

जखमींना रुग्णालयात दाखल: अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात अनेक प्रवासी गंभीर तर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande