छ. संभाजीनगर - सुहास शिरसाठ यांच्या प्रचारार्थ सर्व नगरसेवक व नगरसेविका यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 14 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर व जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार श्री. सुहास शिरसाठ यांच्या प्रचारार्थ सर्व नगरसेवक व नगरसेविका यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत आगामी निवडणूक रणनीत
Q


छत्रपती संभाजीनगर, 14 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर व जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार श्री. सुहास शिरसाठ यांच्या प्रचारार्थ सर्व नगरसेवक व नगरसेविका यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या बैठकीत आगामी निवडणूक रणनीती व प्रचाराच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अतुल सावे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संघटनात्मक बळकटी, बूथस्तरावरील नियोजन तसेच प्रभावी प्रचारयंत्रणा उभारण्यावर सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार श्री. संजयजी केनेकर, महापौर श्री. समीर राजुरकर, माजी महापौर श्री. बापु घडामोडे, प्रदेश सचिव श्री. प्रवीण घुगे, श्री. बसवराज मंगरुळे, श्री. हर्षवर्धन कराड, सौ. छायाताई खाजेकर, श्री. रामेश्वर भादवे, श्री. ताराचंद गायकवाड तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande