आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांची किल्ले धारूर येथे विविध नगरसेवकांची सदिच्छा भेट
बीड, 14 जून (हिं.स.)। बीड लातूर धाराशिव विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महा विकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी किल्ले धारूर येथे विविध नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवर, विकासकामांवर तसेच आगाम
अ


बीड, 14 जून (हिं.स.)।

बीड लातूर धाराशिव विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महा विकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी

किल्ले धारूर येथे विविध नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवर, विकासकामांवर तसेच आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.

नगरसेवकांनी व्यक्त केलेल्या भावना, सूचना आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्थानिक स्वराज्य संस्थांचा आवाज अधिक सक्षमपणे विधानपरिषदेत पोहोचवण्यासाठी आपला हा संवाद आणि सहकार्य निश्चितच बळ देणारे आहे.

आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, विश्वास आणि सहकार्याच्या जोरावर विकासाचा संकल्प अधिक दृढ करण्याचा निर्धार असल्याचे देशमुख यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande