मंठा पोलीस ठाण्याला लवकरच १० नवीन पोलीस - एसपी संधू
जालना, 14 जून (हिं.स.)। जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) तेगबीर सिंह संधू यांनी मंठा पोलीस ठाण्याला भेट देऊन संवाद साधला. यावेळी विविध प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत त्यांनी मंठा शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपायय
Q


जालना, 14 जून (हिं.स.)।

जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) तेगबीर सिंह संधू यांनी मंठा पोलीस ठाण्याला भेट देऊन संवाद साधला. यावेळी विविध प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत त्यांनी मंठा शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

मंठा पोलीस ठाण्यात मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन नवीन पोलीस भरतीमधून १० पोलीस कर्मचारी मंठा पोलीस ठाण्यास देण्यात येतील, असे आश्वासन संधू यांनी दिले.

शहरात अल्पवयीन मुले बुलेट व इतर वाहने रास रोज पणे व बेभान वेगाने पळवत असल्याच्या प्रकारांबाबत त्यांनी गंभीर दखल घेतली जाईल. तसेच बुलेटच्या फटाके फोडणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरविरोधात विशेष मोहीम राबवून संबंधित सायलेन्सर जप्त करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांना दिले.

शाळा व महाविद्यालय परिसरात मोकाट फिरणारे रोड रोमिओ आणि विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या युवकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले असून, शाळा सुरू होताच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष लक्ष व विशेष पथक ठेवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंठा शहरात लवकरच दामिनी पथक कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी एसपी संधू यांनी भेटीसाठी आलेल्या नागरिकांशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शहरातील विविध प्रश्नांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

तरुण, तडफदार आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या एसपी तेगबीर सिंह संधू यांच्या या भेटीमुळे मंठावासीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande