छ. संभाजीनगर - विविध सामाजिक, राजकीय व विकासात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा
छत्रपती संभाजीनगर, 14 जून, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर- जालना ,विधानपरिषद (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणुकीचे प्रचारार्थ शिवसेना कार्यालय सिल्लोड येथील भाजपा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या मतदारांशी संवाद साधला व निवडणुकीसंदर्भात सविस्त
Q


छत्रपती संभाजीनगर, 14 जून, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर- जालना ,विधानपरिषद (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणुकीचे प्रचारार्थ शिवसेना कार्यालय सिल्लोड येथील भाजपा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या मतदारांशी संवाद साधला व निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करून विजयाचा संकल्प दृढ केला.याप्रसंगी आमदार अब्दुलजी सत्तार नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचे प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विधान परिषद उमेदवारीबद्दल शुभेच्छा स्वीकारल्या तसेच विविध सामाजिक, राजकीय व विकासात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

याप्रसंगी, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जि.प. सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, राजूबाबा काळे, नंदकिशोर सहारे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरपरिषदेतील शिवसेना गटनेते सुधाकर पाटील तसेच शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande