सिल्लोड तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतीमध्ये सामूहिक स्वच्छता मोहीम
छत्रपती संभाजीनगर, 14 जून (हिं.स.)सिल्लोड तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतीमध्ये सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संभाजीनगर मिन्नू पी. एम.
Q


छत्रपती संभाजीनगर, 14 जून (हिं.स.)सिल्लोड तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतीमध्ये सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संभाजीनगर मिन्नू पी. एम. यांच्या आदेशानुसार तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड रत्नाकर पगार, प्रभारी गट विकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड आशिष मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतीमध्ये सामूहिक महा-स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सिल्लोड तालुक्यातील मोठ्या १० ग्रामपंचायती मध्ये संपर्क अधिकारी नेमण्यात आले. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह वापर शुल्क वसुलीचा घेतला निर्णय सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागातील वाढते प्लास्टिक प्रदूषण आणि अस्वच्छतेच्या समस्येला आळा घालण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने कंबर कसली आहे. सिल्लोड तालुक्यातील सर्व १०५ ग्रामपंचायतींमध्ये महा-स्वच्छता मोहीम राबवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचा सहभाग घेतला असून, विशेषतः सार्वजनिक ठिकाणचा कचरा आणि प्लास्टिकचे ढिगारे हटवण्यावर प्रशासनाचा मुख्य भर आहे.

ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्या, मंदिरे, नदीपात्रे आणि ओढ्यांच्या काठावर जमा होणारे प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. हेच ओळखून या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आणि प्रत्यक्ष देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गट विकास अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी आणि पंचायत समितीचे विभागप्रमुख अशा किमान १० उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची फौज शनिवारी विविध ग्रामपंचायतींना भेटी देऊन स्वच्छतेच्या कामात सहभागी आहे.

ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या परिसरात प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. परिसर कायम स्वच्छ राहण्यासाठी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ एक दिवसाची स्वच्छता मोहीम राबवून प्रशासनाचा हेतू संपणार नाही. या मोहिमेनंतर संबंधित ग्रामपंचायतींना ही गावे कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापनाचा हा मॉडल केवळ सरकारी अनुदानावर अवलंबून न ठेवता, तो ग्रामपंचायतींच्या आर्थिक सक्षमतेशी जोडला जात आहे. ज्याप्रमाणे शहरात कचरा संकलनासाठी शुल्क आकारले जाते, त्याच धर्तीवर ग्रामीण भागातही व्यावसायिक आणि रहिवासी आस्थापनांकडून कचरा व्यवस्थापन शुल्क गोळा करून ही यंत्रणा स्वयंपूर्ण करणे आवश्यक आहे. मोहिमेत तालुक्यातील सर्व विभागप्रमुख आणि अधिकारी सहभागी होऊन ग्रामीण भागातील अस्वच्छता दूर करतील. केवळ मोहीम राबवून आम्ही थांबणार नाही, तर यापुढे गावे स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींनी दंडात्मक कारवाई आणि कचरा व्यवस्थापन शुल्क वसुलीवर भर द्यावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

ग्रामपंचायत केऱ्हाळा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर सकाळी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा केऱ्हाळा येथून महास्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली गावातील बस स्थानक मुख्य रस्ता या ठिकाणावरील कचरा व प्लास्टिक कचरा हा सामूहिकरीत्या गोळा करण्यात आला.गाव स्वच्छता व परिसर स्वच्छता करण्यात आली तसेच गावातील दुकान मालकांना कचरा वर्गीकरण करण्याबाबत सूचित करण्यात आले आपला कचरा आपली जबाबदारी आपल्या दुकानातील कचरा रस्त्यावर न टाकता दुकानात मध्ये कचराकुंड्या ठेवून त्यात टाकावा असे निर्देश दिले प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली कचरा कुटुंब पातळीवर चार प्रकारच्या कुंड्यांमध्ये वर्गीकरण करावे ओला कचरा, सुका कचरा ,मेडिसिन कचरा, घातक कचरा त्यामुळे कचरा व्यवस्थापन करणे सोयीचे होईल तसेच स्वच्छता केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी कचरा होऊ नये याबाबत जनजागृती करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande