
छत्रपती संभाजीनगर, 14 जून (हिं.स.)मंठा येथे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच गावपातळीपर्यंत शिवसेनेचे कार्य प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. पाटील बोराडे, उद्योग सेना जिल्हाकार्याध्यक्ष प्रल्हादरावजी बोराडे, तालुकाप्रमुख उदयदादा बोराडे, उपजिल्हाप्रमुख किसनरावजी मोरे, माजी सभापती संतोषराव वरकड यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीत संघटन विस्तार, नव्या कार्यकर्त्यांची जोडणी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis