
लातूर, 17 जून (हिं.स.)।
उदगीर तालुका माहेश्वरी सभेतर्फे महेश नवमी सप्ताहानिमित्त स्व.नरसिंगदासजी लखोटिया यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 120 रक्तदात्यानी रक्तदाने ,यात 31 महिला रक्तदात्यानी रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला
उदगीर तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने महेश नवमी सप्ताहानिमित्त स्व.नरसिंगदासजी लखोटिया यांच्या स्मरणार्थ डॉ लखोटिया यांच्या कोमल हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात 120 रक्तदात्यानी स्वेच्छेने रक्तदान केले यात 31 महिलांनी रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला,सर्व रक्तदात्यांना उदगीर तालुका माहेश्वरी सभे तर्फे हेल्मेट भेट देण्यात आले, हे शिबिर संपन्न करण्यासाठी उदगीर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी, मार्गदर्शक ईश्वरप्रसाद बाहेती, डॉ रामप्रसाद लखोटिया,अशोक बाहेती, उपाध्यक्ष बालाप्रसाद मुंदडा,सचिव आनंद बजाज आदींनी विशेष परिश्रम घेतले तर लातूर येथील भालचंद्र ब्लड सेंटरने रक्त संकलन केले.
रक्तदात्यास हेल्मेट भेट ....
उदगीर तालुका माहेश्वरी सभेतर्फे 120रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले असून रक्तदात्यानी रक्तदान करून जीवनदान देण्याचा मानस केला तर माहेश्वरी सभे ने रक्तदात्यास हेल्मेट देऊन एक आदर्श निर्माण केल्याची माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यानी संगीतले
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis