
लातूर, 19 जून (हिं.स.)।लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने नांदेड नाका जलकुंभ येथून शनिवार, 20 जून 2026 रोजी शहरातील विविध भागांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पाईपलाइन गळती दुरुस्ती तसेच पोलीस ट्रेनिंग सेंटर व पोलीस मुख्यालय परिसरातील पाणी वितरणाची जबाबदारी लाईनमन शोभीत गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.सिद्धार्थ सोसायटी, अन्सार कॉलनी, नाथनगर, गाजीपुरा, स्वातंत्र्य सैनिक नगर, रमाबाई नगर, बरकत नगर, तानजुद्दीन बाबा रोडचा काही भाग, हरीभाऊ नगर, पंचशील चौक आदी परिसरांना कचरू कांबळे यांच्या देखरेखीखाली पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.बालाजी नगर, मसोबा नगर, कुष्ठधाम, महादेव नगर, करीम नगर, नूरजहाँ कॉलनी व प्रबुद्ध नगर या भागांमध्ये नामदेव कांबळे यांच्या माध्यमातून पाणी वितरण केले जाणार आहे.महाडा कॉलनी, मनियार नगर, अंजली नगर, चलवाड नगर, इस्लामपुरा आदी परिसरांना इरफान शेख यांच्या देखरेखीखाली पाणीपुरवठा होणार आहे.नांदेड नाका जलकुंभातील उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.ही माहिती कार्यकारी अभियंता चव्हाण, शाखा अभियंता प्रवीण राजे आणि जलकुंभ प्रमुख दिलीप गायकवाड यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis